19 October, 2026

आयुक्त संजय काटकर यांचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणीचे निर्देश

हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आरोग्य केंद्रांना भेटी
​हिंगोली, (दि. १९ ऑक्टोबर):- नागरिकांना शासकीय आरोग्य संस्थांमधून वेळेत, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सेवांचा दर्जा उंचावा, या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा मुंबई आरोग्य व कुटुंब कल्याणचे आयुक्त संजय काटकर यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करण्याचे नुकतेच निर्देश दिले आहेत 
​
​आयुक्त संजय काटकर यांनी १७ ते १९ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन दैनंदिन कामकाज व दस्तऐवजांची (रेकॉर्ड) तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
​या आदेशाची अंमलबजावणी करत हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तिन्ही दिवशी जिल्ह्यातील निरनिराळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाची आणि उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी केली.
​
​आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांना भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने ​बाह्यरुग्ण व अंतररुग्ण विभाग रुग्णांवर होणारे उपचार आणि मिळणाऱ्या सुविधांची पाहणी, औषधी भांडारमध्ये आवश्यक औषधांचा साठा आणि त्यांचे वितरणची माहिती घेण्यात आली.​ प्रसूती विभागात प्रसूती कक्षातील स्वच्छता, सुरक्षितता आणि शस्त्रक्रिया गृहातील सज्जताची पाहणी केली. 
​प्रयोगशाळा विभागात विविध वैद्यकीय चाचण्यांची स्थिती व तपासणी अहवाल,
​याशिवाय, केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आणि ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपातील नोंदवह्या (रेकॉर्ड) आणि दैनंदिन कामकाजाच्या नोंदींची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येत आहे.
         00000

No comments: