15 June, 2017

अपंग विद्यार्थ्यांना पदवी, आयटीआय प्रवेशाकरिता आवाहन
हिंगोली, दि. 15 : अपंग कल्याण आयुक्तालय, पुणे मार्फत मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, देगलुर या प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 15 ते 35 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला – मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. सदरील प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण ( सी.सी.ईन. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर टायपिंग), वेल्डर आणि सीट मेटल, शिवन व कर्तन कला सी. सी. ईन. सौंदर्यशास्त्र, सी. सी. ईन. वायरमन आणि प्लंबर, सी. टी. सी. इत्यादी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकिय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहितयाची विनामूल्य सोय केली आहे.  प्रवेशितांना प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येते.
तरी इच्छूक अपंग मुला-मुलींना किंवा पालकांनी दि. 30 जून 2017 पर्यंत प्रवेशासाठी प्राचार्य, तुळजा भवानी अपंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपुर रोड, देगलुर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावा किंवा 9960900369 / 9175446411 / 7276320578 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर जि. नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: