13 June, 2017

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी
प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम
        हिंगोली, दि. 13 : माहे ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 2017-2018 प्रभाग व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून देण्यात आला आहे.
          दिनांक 03 जुलै 2017 प्रारूप प्रभाग रचनेला (नमुना-ब) व्यापक प्रसिध्दी देणे. तहसीलदार यांनी हरकती व सुचना मागविण्यासाठी जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 04 जूलै 2017, हरकती  सादर करण्याचा अंतिम दिनांक 11 जूलै 2017, प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सुचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे दिनांक 25 जुलै 2017, प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे दिनांक 31 जूलै 2017 आणि अंतिम प्रभाग रचनेला (नमुना- अ मध्ये) व्यापक प्रसिध्दी देणे दिनांक 03 ऑगस्ट 2017 असा आहे.
               माहे ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 कालावधीमध्ये राखीव जागेकरीता निवडणूक लढवायची असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव पडताळणी समितीकडे संबंधीत तालुक्याचे तहसील कार्यालयामार्फत सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


*****

No comments: