17 June, 2017

आपत्ती व्यवस्थापन/शोध व बचाव कार्यात
सेवाभावी संस्था व स्वयंसेवक समूहानी सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 17 : जिल्हा महापूर, वीजपडी, रस्ते अपघात, दुष्काळ इत्यादी आपत्तींना प्रवण आहे. जिल्ह्यातील आपत्ती प्रतिबंध उपाययोजना शासकीय विभागांमार्फत केली जाते. तसेच अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जिवितहानी कमी करण्यासाठी अशा आपत्तींना तातडीने प्रतिसाद देऊन शोध व बचाव कार्य मार्फत जिवितहानी टाळता येऊ शकते.
                      जिल्ह्यात जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी विवीध सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह जीवितहानी कमी करण्याच्या हेतूने कार्य करत असतात. परंतु सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह यांना आपत्ती व्यवस्थापन/शोध व बचाव प्रशिक्षण नसल्याने शोध व बचाव कार्य करते वेळी संस्थांमध्ये व प्रशासकीय यंत्रणामध्ये समन्वय होत नाही. त्यामुळे आपत्तींमध्ये अडकलेल्या नागरीकांची सुटका करण्याचा उद्देश सफल होत नाही. त्यामुळे अशा इच्छुक सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह यांची माहिती एकत्रित करून त्यांना आपत्ती व्यवस्थापन व शोध व बचाव प्रशिक्षण देऊन आपत्कालीन परीस्थितीत तात्काळ मदत कार्य करता येऊ शकते.
                      त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक सेवाभावी संस्था व स्वयंसेवक समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन/शोध व बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या संस्थेची माहिती तात्काळ दि. २४ जून, २०१७ पर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली या कार्यालयात नोंदवावी तसेच संपर्कासाठी ९५२७०४४१७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.  

***** 

No comments: