21 June, 2017

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न
हिंगोली, दि. 21 : संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केलेला आहे. 5 हजार वर्षाहुन अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभुत आहे. तिसऱ्या जागतिक योगा दिनाचे आयोजन हिंगोली येथील शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय (भारतीय विद्या मंदिर) येथे सकाळी 6.30 वाजता करण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन आमदार तान्हाजीराव मुटकुळे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी रामजी गांजवे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी डि. आर. चवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, लेखा व वित्त अधिकारी श्री. हिवाळे, ऍ़ड शिंदे, योग शिक्षक रामदासजी धनवे, पतंजली योग समितीचे अध्यक्ष लेकुळे दत्तात्रय, श्री. निर्मले, श्री. दायमा, सौ. तापडीया, गजानन बासटवार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, संजय बेतीवार, संतोष फुफाटे, हिंगोली येथील सर्व क्रीडा प्रेमी, योग साधक, अधिकारी, कर्मचारी, क्रीडा मंडळ, विविध खेळ संघटना, सामाजिक संघटना, युवक मंडळ, स्वयंसेवी मंडळ, श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व शिक्षक बंधु-भगिनीं, शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी/विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी वाशिम येथील पतंजली राज्य कार्यकारणी सदस्य व योग शिक्षक रामदासजी धनवे यांनी आयुष मंत्रालय, भारत सरकार व्दारा ठरवुन दिलेल्या 45 मिनिटाच्या योग (प्रोटोकॉल) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगाचे महत्व, सर्वांसाठी योग का आवश्यक आहे व आरोग्यासाठी योग याचे प्रशिक्षणासाठी प्रात्यक्षिकासह  दाखवले. हा आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पतंजली योग समिती सर्व योग साधक, श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जितेंद्र भट, श्री. लोळेवार व सर्व शिक्षक बांधव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले. 

*****

No comments: