09 June, 2017

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताहनिमित्त
 नेत्र तपासणी व नेत्रदान शिबीराचे आयोजन
हिंगोली दि. 9 : प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार दि. 10 जून, 2017 ते 16 जून, 2017 या कालावधीत मोफत नेत्र तपासणी, नेत्रदान व डोळ्याच्या इतर आजाराविषयी माहिती देण्याकरिता शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय हिंगोली संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत राज्यात राबविल्या जाणाऱ्या दृष्टी दिन शिबीराचे आयोजन दि. 10 ते 16 जून, 2017 दरम्यान रविवार सोडून होत आहे. मोफत नेत्र तपासणी शिबीर साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मोतिबिंदू, नेत्रविकार नेत्र विकाराचा प्रतिबंध निदान आणि व्यवस्थापन करणे. सदरील शिबीरास जास्तीत-जास्त नागरिकांनी नेत्रविषयक आजाराविषयी माहिती घेऊन शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

No comments: