13 June, 2017

खत विक्रेत्यांना कृषि पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
          हिंगोली, दि. 13 :  केंद्र शासनाच्या MANAGE (मॅनेज) या राष्ट्रीय संस्थेच्या डीएईएसआय (Diploma in Agriculture Extension Services For Input Dealers) हा एक वर्षीय कृषि पदविका अभ्यासक्रम हिंगोली जिल्ह्यात या वर्षापासून सुरू करण्यास शासन मान्यता मिळाली आहे.
            सदर कृषि पदविका अभ्यासक्रम कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे राबवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी शासनाने एकूण 20 हजार रुपये फी ठेवलेली असून त्यापैकी 50 टक्के  शासनाकडून अनुदान रुपाने दिले जाणार असून उर्वरित 50 टक्के म्हणजे 10 हजार रुपये एवढीच फीस भरावयाची आहे.
            या वर्षासाठी केवळ 40 प्रशिक्षणार्थ्याचीच निवड करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या खत विक्रेत्यासाठीच्या आवश्यक शैक्षणिक अर्हतेसाठी हे पदविका प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
            सदर अभ्यासक्रमासाठी इच्छूक खत विक्रेत्यांनी दि. 15 जून, 2017 पर्यंत विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक व कृषि विज्ञान केंद्रामार्फत करण्यात येत आहे. प्रवेश अर्जाचा नमुना उपरोक्त तिन्ही कार्यालयात उपलब्ध करण्यात आला आहे.

***** 

No comments: