17 June, 2017

जागतिक सिकलसेल दिनानिमित्त सोल्युबिलिटी चाचणी करण्याचे आवाहन
हिंगोली दि. 17 : हिंगोली जिल्हयामध्ये नोव्हेबर 2012 मध्ये सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाअंतर्गत 1 ते 30 वयोगतील व्यक्तीची सोल्युबिलिटी चाचणी करण्यात येते.  नोव्हेबर 2012 पासून मे 2017 पर्यंत अद्याप 3 लाख 97 हजार 91 सिकसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आले असून त्यामध्ये एकुण 75 सिकलसेल रुग्ण आढळून आले आहेत. तर 813 सिकलसेल वाहक आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे सिकलसेल रुग्णासाठी डे-केअर सेंटरची ची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये रुग्णांना मोफत उपचार, वैद्यकीय सल्ला व समुपदेशन करण्यात येते.
हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री-रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सर्व स्तरावर सिकलसेल तपासणी मोफत करण्यात येते. जागतिक सिकलसेल दिन 19 जून रोजी जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर 2012 पासून सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पि. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डि. एम. धनवे व जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. आकाश कुळकर्णी मार्फत तसेच रा.आ.अ. चे शंकर तावडे जि.का. व्यवस्थापक, श्रीपाद गारुडी जि.ले.व्या., संदीप मुरकर सिकलसेल समन्वयक व सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.
तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली सिकलसेल सोल्युबिलिटी चाचणी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात करून घ्यावे. 

*****

No comments: