15 December, 2017

जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत आतापर्यंत 36 कोटी 64 लाखांचे वाटप --प्रभाकर शिंदे, अग्रणी बँक व्यवस्थापक



वृत्त क्र.575
जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत आतापर्यंत
36 कोटी 64 लाखांचे वाटप
--प्रभाकर शिंदे, अग्रणी बँक व्यवस्थापक
हिंगोली, 15 :-जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत  राष्ट्रीयीकृत , खाजगी , ग्रामीण  बँक , खाजगी वित्त संस्थांतर्फे 11 हजार 544  खातेदारांना  36 कोटी 64 लाख रुपयांचे  वाटप केल्याची माहिती  अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे .
भारतीय स्टेट बँकेकडून 25 शिशु गट, 120 किशोर गट तर 33 तरुण गटासाठी एकूण 6 कोटी  48 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे .  तर सार्वजनिक वित्त संस्थांकडून 84 शिशु गट , 114 किशोर गट  तर 22 तरुण गटांसाठी एकूण 3 कोटी 94 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे .  खाजगी वित्त संस्थांकडून 147 शिशु गट , 01 किशोर गटासाठी एकूण 40 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे .  महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि  विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून 109 शिशु गट, 148 किशोर गट तर 9 तरुण गटासाठी एकूण 3 कोटी 68 लाख रुपयांचे  वितरण करण्यात आले आहे . स्पंदनस्फुर्ती मायक्रोफायनान्स प्रा.लि. कडुन 1221 शिशु गटासाठी एकूण 2 कोटी 84 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे . ग्रामीण कोटा फायनान्सियल  सर्व्हिसेस  प्रा. लि. कडून 2080 शिशु गटांसाठी 3 कोटी 42 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे . शेअर मायक्रोफिन लिमिटेडकडून 438 शिशु गटांसाठी 98 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे .  अस्मिता  मायक्रोफिन लिमिटेडकडून 152 शिशु गटांसाठी 33 लाख  तर एसकेएस मायक्रोफायनान्स  लिमिटेडकडून 6 हजार 841 शिशु गटांसाठी एकूण 15 कोटी 55 लाख रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक प्रभाकर शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .
0000

No comments: