15 December, 2017

दहा रुपयांचे नाणे,5 रुपयांची नोट आणि 50 रुपयांची नवीन नोट आर्थिक व्यवहारामध्ये नाकारणे हा दखल पात्र गुन्हा



वृत्त क्र.574                                               दिनांक : 15 डिसेंबर 2017
दहा रुपयांचे नाणे,5 रुपयांची नोट आणि 50 रुपयांची नवीन नोट
आर्थिक  व्यवहारामध्ये नाकारणे हा दखल पात्र गुन्हा 
हिंगोली, 15 :-जिल्हास्तरीय  बॅकर्स समन्वय समितीची बैठक दिनांक 14 डिसेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी श्री अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस  भारतीय रिझर्व्ह बँक , नाबार्ड , अग्रणी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक , ग्रामीण  स्वयंरोजगार  प्रशिक्षण संस्था, आर्थिक  विकास  महामंडळे  तसेच सर्व राष्ट्रीयीकृत  बँक, खाजगी क्षेत्रातील  बँक , सहकारी बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते .  या बैठकीमध्ये  जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप, छत्रपती  शिवाजी महाराज  शेतकरी सन्मान योजने अंतर्गत  शेतकऱ्यांना कर्जमाफी स्टँडअप इंडिया योजना , महाराष्ट्र राज्य  जीवन्नोत्ती अभियान अंतर्गत  बचत गटांना  कर्ज वाटप  तसेच चलनात  प्रचलित  असलेल्या  नाणे / नोटा  विशेषत: रुपये 10 च्या नाण्यासंबंधी प्रचलनात  येणाऱ्या  अडचणींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली .
रुपये 10 चे नाणे , 5 रुपयांची नोट आणि 50 रुपयांची नवीन नोट हे सर्व  वैध चलन असून  परीचलनामध्ये आहेत व त्यांचा आर्थिक  व्यवहारामध्ये  जास्तीत जास्त  वापर झाला पाहिजे हे सर्व चलन / नाणे वैध व अधिकृत चलन असून त्याचा अस्वीकार  करणे हा दंडनिय  अपराध आहे, तसेच  बँकींग ॲक्टनुसार हा दखल पात्र  गुन्हा  आहे . आर्थिक व्यवहार  पूर्ण करतेवेळी कोणत्याही व्यक्तीने हे सर्व नाणे / चलन  नाकारले तर संबंधितांविरुध्द रितसर तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये  दाखल करुन त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात  तसेच अग्रणी बँक व्यवस्थापक  यांना सादर करावी असे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले .
तसेच जनतेला व्यवहारामध्ये  सोईये व्हावे म्हणून जुन्या , फाटक्या , मळक्या नोटा  बदलून देण्याची व्यवस्था  सर्व बँक शाखेमध्ये  भारतीय रिझर्व्ह  बॅंक  (नोट रि फंड ) रुल्स 2009 नुसार करण्यात आली आहे . तरी सर्व जनतेने  वरील सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी , भारतीय रिझर्व्ह बॅकेच्या प्रतिनिधींच्या वतीने  आणि अग्रणी बॅक व्यवस्थापक हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0000

No comments: