21 December, 2017

लघु उद्योगांनी उत्कृष्ट कामगिरीकरिता देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन



वृत्त क्र.582                                              
लघु उद्योगांनी उत्कृष्ट कामगिरीकरिता देण्यात
येणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि.21:- उद्योग संचालनालय , महाराष्ट्र शासन यांच्यावतीने  दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या लद्यु उद्योग घटकांना प्रथम  व द्वितीय  पारितोषिक  देऊन गौरविण्यात येते . प्रथम  पुरस्कारासाठी  रु. 15 हजार  व गौरवचिन्ह  तर द्वितीय पारितोषिक रु.10 हजार  व गौरवचिन्ह दिले जाते . सन 2017 करिता  जिल्हा पुरस्कारासाठी  हिंगोली जिल्ह्यातील  पात्र लघु उद्योग  घटकाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे .
                उद्योग घटकांची  जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग म्हणून तीन वर्षांपूर्वी  म्हणजेच  दिनांक 1 जानेवारी 2014 पूर्वी नोंदणी झालेली असावी व उद्योग घटक मागील  दोन वर्षांपासून उत्पादनात  असणे आवश्यक  आहे , उद्योग घटक कोणत्याही  वित्तीय  संस्थेचा थकबाकीदार नसावा, यापूर्वी ज्या  उद्योग घटकांना  राज्यस्तरीय  किंवा राष्ट्रीय  स्तरावर पुरस्कार मिळालेले नाहीत  असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारांसाठी पात्र ठरतील. विहित नमुन्यातील  अर्ज व अधिक माहितीकरिता  जिल्हा उद्योग केंद्र , हिंगोली  या कार्यालयाकडे  कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा , अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2017 आहे , या सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील  पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
000

No comments: