21 December, 2017

शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे एकात्मिक पध्दतीनेकिड व्यवस्थापन करावे



वृत्त क्र.580                                               दिनांक : 21 डिसेंबर 2017

शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे एकात्मिक पध्दतीने
किड व्यवस्थापन करावे 
        हिंगोली, दि.21: जिल्ह्यात  हरभरा पीक  काही ठिकाणी  वाढील अवस्था तर काही ठिकाणी  फुलोरा अवस्थेमध्ये आहे. मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे घाटे  अळीचा प्रादुर्भाव  काही ठिकाणी दिसून आला  आहे . अळीच्या  बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहून  वेळीच  एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा  अवलंब करावा असे  आवाहन  उपविभागीय  कृषि अधिकारी यु.जी. शिवणगावकर  यांनी केले आहे . हरभरा  पिकात  एकरी 10-15  लागडी पेक्षा  उभारावेत  जेणेकरुन  पक्षी त्याच्यावर  बसून अळ्या  वेचून खातील व नैसर्गिक  पध्दतीने  अळ्यांचा बंदोबस्त  होण्यास  मदत होईल .  मोठ्या अळ्या  हाताने  वेचून रॉकेल मिश्रित  पाण्यात  बुडवून नष्ट  कराव्यात . हरभऱ्यावरील  घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात  सर्वेक्षणाच्या उद्देशाने  एकरी 3 कामगंध सापळे  लावावेत. कामगंध  सापळ्यात  सतत दोन  ते तीन दिवस 7 ते 8 पतंग  सापडल्यास पिक संरक्षणाची  उपाययोजना  करावी .  सुरुवातीच्या काळात  लिंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी. घाटे अळीच्या  अंडी अवस्थेत  नियंत्रणसाठी  ट्रायकोग्राम  या  परोपजीवी  किडीचे  अंडी  एकरी  10 हजार  अंडीचे  ट्रायको कार्ड शेतात  लावावे . अळीचा  प्रार्दुभाव  आर्थिक  नुकसानीच्या पातळीवर  गेल्यास  क्लोरोपायरीफॉस  20 ईसी 20 मिली किंवा किनॉलफॉस  25 ईसी 20 मिली किंवा इमामेक्टीन  बेनझोएट  5 एसजी 4 ग्राम किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 एससी 2.5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी  करावी. पेट्रोल पंपासाठी  किटकनाशकाची  मात्रा तीन पट करावी .  तसेच रासायनिक  किटकनाशक  सकाळी  किंवा सायंकाळी  वारा शांत असल्यास फवारणी  करावी . फवारणी करताना  सुरक्षिततेच्या दृष्टीने  योग्य ती  काळजी घ्यावी , असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांनी केले आहे .
00000

No comments: