30 December, 2017

सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



वृत्त क्र.591                                                दिनांक : 30 डिसेंबर 2017
सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील  सहकारी संस्थांचे
 प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.30:- महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2013 मधील सुचनेनुसार सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविणेसाठी मा.सहकार आयुक्तांनी त्यांचे दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजीच्या पत्रान्वये सूचना दिल्या असून प्रस्ताव सादर करणे, छाननी करणे आणि सहकार पुरस्कारासाठी निवड करणेचा कालबद्ध कार्यक्रम पाठविण्यात आला आहे. सदर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
अ.
क्र.
कार्यवाहीचा
दिनांक/कालावधी
करावयाची कार्यवाही
कार्यवाही करणारे
कार्यालय
1
01/01/2018
सहकार पुरस्कार सन 2016-17 कार्यक्रमास प्रसिद्धी देणे
जिल्हा उपनिबंधक
2
02/01/2018
ते
16/01/2018
सहकारी संस्थांनी आपले पुरस्कारासाठीचे प्रस्ताव ज्या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे. त्या तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांचेकडे सादर करणे.
1)       जिल्हास्तरावर गटनियम/प्रकार नियम किमान 10 संस्थांचे प्रस्ताव आवश्यक.
2)      संस्थेचा प्रस्ताव दाखल होत असतांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत असल्याचे खात्री करावी. अपूर्ण कागदपत्रे पूर्ण करुन घेणे बाबत संबंधितांना मार्गदर्शन करणे.
सहाय्यक निबंधक
3
17/01/2018
ते 20/01/2018
तालुका सहाय्यक निबंधक यांनी जिल्हा उपनिबंधक यांचेकडे छाननी करुन प्रस्ताव सादर करणे.
सहाय्यक निबंधक
4
22/01/2018
ते 29/01/2018
जिल्हा उपनिबंधक समितीने छाननी करुन प्रस्ताव विभागीय सहनिबंधक यांचेकडे सादर करणे.

जिल्हा उपनिबंधक
5
30/01/2018
ते 06/02/2018
विभागीय सहनिबंधक समितीने छाननी करुन प्रस्ताव सहकार आयुक्त व निबंधक यांचेकडे सादर करणे.

विभागीय सहनिबंधक
6
07/02/2018
ते 16/02/2018
सहकार आयुक्त स्तरावरील समितीने छाननी करुन प्रस्ताव शासनाकडे पाठविणे करणे.

सहकार आयुक्त
7
17/02/2018
ते 26/02/2018
शासन स्तरावरील मा.मंत्री (सहकार) यांचे अध्यक्षते खालील समितीने पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम निवड करणे.
--

त्यानंतर राज्यस्तरावर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली यांनी कळविले आहे .
000000

No comments: