04 December, 2018

सशस्त्र सेना ध्वजदिन कार्यक्रमाचे 7 डिसेंबर रोजी आयोजन· निधी सकंलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा


सशस्त्र सेना ध्वजदिन कार्यक्रमाचे 7 डिसेंबर रोजी आयोजन

·   निधी सकंलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा
·                      
        हिंगोली,दि.4: सशस्त्र सेना ध्वजदिन 2018 चे दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता येथील जिल्हा नियोजन समितीच्या (डी.पी.सी.) सभागृहात आयोजन करण्यात येणार आहे. या दिवशी निधी संकलनाचा शुभारंभ तसेच माजी सैनिक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी अध्यक्ष म्हण्न जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड तर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांची  उपस्थिती असणार आहे.
            आजी व माजी शूर सैनिकांच्या प्रती ज्यांनी देशासाठी आपले जीवन अर्पिले, त्यांचे प्रती नागरिक कृतज्ञता व त्यांची गुणग्राह्यता व्यक्त करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज निधीचे संकलन केले जाते. संकलन केलेला निधी युध्दात देशासाठी आपल्या प्राणांची आहूती युध्द विधवा, अपंग सैनिक, आजी व माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी राज्यस्तरावर सैनिक कल्याण विभागाने आखलेल्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो.
****

No comments: