17 December, 2018

लाच मागणाऱ्या व्यक्तींची तक्रार करण्याचे आवाहन


लाच मागणाऱ्या व्यक्तींची तक्रार करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.17: जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत समृध्द महाराष्ट्र योजनेअंतर्गत सिंचन विहिर, शोष खड्डे, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, विशेष घटक योजना , आदिवासी उपयोजना, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग,  महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग इत्यादी विभागांच्या वयैक्तीक लाभांच्या विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी पात्रता सिध्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे सादर करावा. प्राप्त  झालेल्या प्रस्तावांची छाननी करुन संबंधित लाभार्थ्यांची  निवड सक्षम यंत्रणेमार्फत केली जाते. याकरीता नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थांशी  किंवा दलालांशी संपर्क करु नये. जर कोणी लेाकसेवक किंवा त्रयस्त्‍ व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे संपर्क साधवा. लाचलूचपत कार्यालयातचा पत्ता पोलीस अधीक्षक कार्यालय, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, नांदेड रोड, हिंगोली, दुरध्वनी क्रमांक / फॅक्स क्रमांक -02456-223055, ई-मेल dyspacbhingoli@gmail.com, मोबाईल क्रमांक 9823215195, 9920049232, 9923042565 निशुल्क दूरध्वनी क्रमांक 1064, ऑनलाईन तक्रारी पाठविण्याकरिता www.acbmaharashtra.gov.in ACB Maharashtra Mobile App  द्वारे ही आपण तक्रारी करु शकतात.

No comments: