05 December, 2018

नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री. हुजुर अपचलनगर बोर्ड निवडणुक टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणाऱ्या मतदारांना जाहिर सूचना


नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री. हुजुर अपचलनगर बोर्ड निवडणुक 
टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणाऱ्या मतदारांना जाहिर सूचना

        हिंगोली, दि. 5: महाराष्ट्र शासन  महसूल व वन विभाग  मंत्रालय , मुंबई अधिसूचना  दिनांक 27 जून 2018 नुसार नांदेड शिख गुरुद्वारा  सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यांना  निवडून देण्यासाठी मतदार क्षेत्र औंरगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड,लातूर  हे संपूर्ण जिल्हे व चंद्रपूर  जिल्ह्यातील  राजुरा, कोरपना व जीवती हे तालुके (तत्कालीन हैद्राबाद निजाम संस्थांनाचा महाराष्ट्रातील भाग) येथील महाराष्ट्र विधानसभेसाठी दिनांक 1 जुलै 2018 या अर्हता दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीतील समाविष्ठ  शिख धर्मीय मतदारांची यादी तयार करुन निवडणुक घेण्यासाठी निम्नस्वाक्षरीतांना निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे अंतिम मतदार यादी दिनांक 22 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिध्द  झाली असून दिनांक 26 नोव्हेंबर रोजी निवडणुक  कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
            नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री. हुजुर अपचलनगर बोर्ड निवडणुक नियेत 1963 चे नियम 24(अ)(ब) (क)(ड) नुसार सदर निवडणुकीस खालील पात्र मतदार टपालाने मतदान करु शकतात-वरीलप्रमाणे मतदार यादीत नाव समाविष्ट असलेले  सैन्य दलात  काम करणारे अधिकारी , कर्मचारी , भारत सरकारद्वारा विदेशात नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी  ज्यांचे नाव  सदर निवडणुकीच्या मतदार यादीत समाविष्ट  आहे, अ आणि ब  मध्ये नमूद अधिकारी, कर्मचारी  यांच्या धर्मपत्नी  ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे, प्रतिबंधीत  उपाययोजना खाली स्थानबध्द केलेल्या व्यक्ती, ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे.
            वरीलप्रमाणे पात्र मतदाराने दिनांक 14 डिसेंबर 2018 पर्यंत  मतपत्रिका मिळण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी, नांदेड  शिख गुरुद्वारा  सचखंड श्री हुजुर अपचलनगर साहिब मंडळाची निवडणुक 2018 तथा जिल्हाधिकारी नांदेड यांचे नावाने  पुराव्यानिशी मतदार यादीतील खंड, उपखंडाचे नाव व अनुक्रमांकासह नमुन्यात लेखी अर्ज सादर  केल्यास टपाली मतपत्रिका पाठविण्यात येईल, याबाबत सर्व संबंधितांनी  नोंद घ्यावी , असे जिल्हाधिकारी , नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****

No comments: