04 December, 2018

जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धचे आयोजन


जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धचे आयोजन
            हिंगोली, दि.4: केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांच्या वतीने 18 ते 29 वयोगटातील युवक/युवतींसाठी जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धा शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे दि. 10 डिंसेबर, 2018 रोजी सकाळी 10:00 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
            या स्पर्धेतून निवड होणारे विजेते राज्यस्तरीय स्पर्धेत आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार आहेत. सदर वत्कृत्व स्पर्धा तालुका ते राष्ट्रीय पातळीपर्यंत असल्याने स्पर्धकांना हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये विषय मांडावा लागणार आहे. सदर स्पर्धेसाठी एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण’ हा विषय ठेवण्यात आलेला आहे. विषय मांडण्यासाठी प्रत्येक स्पर्धकास 10 मीनिटे एवढा वेळ देण्यात येईल. जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे रोख रू. 5,000/-, रू. 2,000/-, रू. 1,000/- व गौरवपत्र तर राज्यस्तरावर रोख रू. 25,000/-, रू. 10,000/- , रू. 5,000/- व गौरवपत्र तर राष्ट्रीय पातळीवर रोख रू. 2,00,000/-, रू. 1,00,000/-, रू. 50,000/- व गौरवपत्र पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहेत.
            स्पर्धेत केवळ तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धकांनाच सहभाग घेता येईल. जिल्हास्तरावरील प्रथम विजेत्या स्पर्धकाला राज्यस्तरीय स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल, राज्य पातळी वरील विजेत्यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्याची संधी मिळणार आहे.
****

No comments: