12 December, 2018

युवा महोत्सव संपन्न


युवा महोत्सव संपन्न

        हिंगोली,दि.12:क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित  जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 11 डिसेंबर रोजी कळमनुरी येथील आत्मज फाऊंडेशन येथे करण्यात आले होते. या युवा महोत्सवाचे उद्घाटन कवी प्रा. डॉ. कल्याण कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रीडा अधिकारी किशोर पाठक होते. तर प्रमुख अतिथी आत्मज फाऊंडेशनचे कैलास नाईक, प्रा. संजय मुलगीर, यलप्पा मिटकर, प्रकाश इंगळे, विजय जोशी, संजय बेतीवार, क्रीडा अधिकारी डुरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले आदीची  उपस्थिती होती.
            युवा महोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी लोकगीत, लोकनृत्य, एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय वाद्य, सितार, तबला, हार्मोनियम या कला प्रकारात सहभाग नोंदवून आपल्या कला यावेळी सादर केल्या.
            युवा महोत्सवात पंच म्हणून प्रा.संजय मुलगीर, विजय जोशी, प्रकाश इंगळे, कैलास नाईक, प्रा. कल्याण कदम यांनी काम पाहिले. महोत्सवात कळमनुरीच्या आत्मज विद्यामंदीरातील कलावंतांनी लोकनृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या महोत्सवाचे यशस्वी आयोजनास इंगोले, शिंदे, सौ. आघाव, वानोळे, नावडे, शिंदे, कांबळे यांनी सहकार्य केले.

****

No comments: