03 December, 2018

भाडे तत्वावर वाहनासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन


भाडे तत्वावर वाहनासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.3: सहायक संचालक, नगर रचना, हिंगोली कार्यालयामध्ये भाडे तत्वावर Swift dzire / Indigo / Sedan Cars / Ford Aspire या सारख्या चारचाकी वाहनाची आवश्यकता आहे. त्याकरिता वाहन मालकाकडून इंधनविरहित दरपत्रक मागविण्यात येत आहे. इच्छूकांना दर निविदेच्या अटी व शर्ती या कार्यालयाच्या सूचना फलकावर पाहावयास मिळतील. तसेच आपली दरपत्रके सिलबंद पाकीटात बातमी प्रसिध्द झाल्यापासून दि. 6 डिसेंबर, 2018 रोजी 5.00 वाजेपर्यंत सहायक संचालक, नगर रचना कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-3, हिंगोली-431513 या कार्यालयाकडे पोहचतील अशा बेताने पाठविण्यात यावे, असे आवाहन सहायक संचालक, नगर रचना कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: