05 December, 2018

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन क्रिडा विभागाकडून जिल्ह्यातील युवक-युवतीना युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन


जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
·                     क्रिडा विभागाकडून जिल्ह्यातील युवक-युवतीना युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

        हिंगोली,दि,5:राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवक कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी , हिंगोली व आत्मज विद्यामंदिर मोठ्या मारोती मंदिराजवळ, कळमनुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 11 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता आत्मज विद्यामंदिर , कळमनुरी येथे करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका(इंग्रजी किंवा हिंदी), शास्त्रीय गायन , शास्त्रीय वाद्य- सितार, बासरी, वीणा, तबला, मृदंग , हार्मोनियम आणि गिटार इत्यादी कला प्रकार आवश्यक आहेत.अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: