09 July, 2022

 

अमरनाथ यात्रेतील यात्रेकरुंची माहिती व्हॉटसअप क्रमांकावर कळविण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 09 : अमरनाथ येथे ढगफुटी झाली असून काही नागरिक अडकल्याची भिती आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातून अमरनाथ येथे काही नागरिक गेले असल्यास त्यांची यादी (नाव, संपर्क क्रमांक) 9405408939 या व्हाट्सअप क्रमांकावर टाकण्यात यावी.

तसेच त्यांचा संपर्क होत आहे किंवा कसे तसेच ते सुरक्षित आहेत का याबाबत या क्रमांकावर कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली  मार्फत करण्यात आले आहे.

*****

No comments: