25 June, 2025

वसमत आयटीआयमधील 15 विद्यार्थ्यांची एल ॲन्ड टी कंपनीसाठी निवड

हिंगोली (जिमाका), दि. 25 : वसमतनगर येथील स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयमधील आजी, माजी विद्यार्थ्यांसाठी संस्थेमध्ये भारतातील नामांकित कंपनी एल ॲन्ड टी मुंबई येथील कंपनीला बोलावून कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस मुलाखतील 15 विद्यार्थ्यांनी निवड करुन त्यांना निवड पत्र देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मुलाखतीला सामोरे जाऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कंपनीकडून आलेले प्रतिनिधी नागसेन खंदारे यांनीही विद्यार्थ्यांना कंपनीची माहितीसह कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारे वेतन, सोयी सुविधा व इतर भत्ते याची माहिती दिली. त्यानंतर संस्थेतील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन तात्काळ निकाल घोषित केले. या कॅम्पस मुलाखतीसाठी संस्थेतील गट निदेशक टी. जे. झाड, निदेशक जी. आर. कोरवार, जी. एन. येमेवार, एन.एस. सबनवार, एस.आर.पडघन, एस.आर.खुपसे श्रीमती आर. जे. शहारे तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. *****

No comments: