29 June, 2025

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

हिंगोली(जिमाका), दि. 29 : दरवर्षी 29 जून हा दिवस भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे सांख्यिकीय क्षेत्रामध्ये केलेले अतुल्य योगदान लक्षात घेता देशभरात राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा केला जातो. जिल्हा सांख्यिकी कार्यालयामध्ये आज सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या श्रीमती निशा नवले यांनी पी. सी. महालनोबीस यांच्याविषयी माहिती करून दिली. तर धीरज जाधव यांनी सांख्यिकी दिनाचे महत्त्व विशद केले. जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी संतोष धारे यांनी आपल्या भाषणामध्ये पी. सी. महालनोबीस यांचा जीवनपट व त्यांचे सांख्यिकी मधील योगदान या विषयावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय नमुना पाहणी सर्वेक्षण ही संस्था दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिवसासाठी एक थीम निश्चित करीत असते. वर्ष 2025 करीता राष्ट्रीय सांख्यिकी दिवसासाठी ''75 इयर ऑफ नॅशनल सँपल सर्वे'' अशी निश्चित करण्यात आली आहे. या थीमच्या आधारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण या विषयावर कार्यालयातील सहायक संशोधन अधिकारी अतिवीर करेवार यांनी सादरीकरण केले. अध्यक्षीय समारोपामध्ये कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड यांनी पी. सी. महालनोबीस व सांख्यिकी दिन या विषयावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन त्यांना वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यालयातील सांख्यिकी सहायक प्रकाश लोथे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयातील माधव सोपने व तुषार टेकाम यांनी काम केले आहे. कार्यक्रमासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ********

No comments: