24 June, 2025

बायोमेट्रीक प्रणालीवर उपस्थिती न नोंदविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

हिंगोली (जिमाका), दि.24 : शासनाने प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची कार्यालयात उपस्थिती होतांना बायोमॅट्रीक मशीनवर नोंदविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात व सर्व उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले आहे. शासनाने दिनांक 29 फेब्रुवारी, 2020 पासून पाच दिवसाचा आठवडा लागू केला असून सोमवार ते शुक्रवार कार्यालयातील कामकाजाची वेळ सकाळी 09.45 ते सायंकाळी 6.15 अशी निश्चित करण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्हा आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उक्त नमूद केलेल्या वेळेत बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे कार्यालयात उपस्थिती नोंदविण्यात यावी, जे कर्मचारी अशा पध्दतीने उपस्थिती नोंदवित नसतील त्या अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जे अधिकारी कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या कार्यालयातील कामकाजाच्या विहित वेळेत बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे कार्यालयात उपस्थिती नोंदवित नाही त्या अधिकारी कर्मचारी यांची अर्धा दिवसाची गैरहजेरी समजून त्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत आदेश दिले आहे. ******

No comments: