30 June, 2025

शाश्वत विकास ध्येये-जिल्हा निर्देशांक आराखडा प्रगतीमापन अहवाल पुस्तकाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते विमोचन

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सन 2015-16 ते 2022-23 या वर्षांकरिता शाश्वत विकास ध्येय्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यांतर्गत सर्व घटकनिहाय सांख्यिकी माहिती असलेले प्रकाशन तयार करण्यात आले आहे. या पुस्तकाचे विमोचन आज सोमवारी (दि.30) रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रगतीमापन अहवालामध्ये जिल्ह्याच्या सन 2015-16 ते 2022-23 या संदर्भीय वर्षांकरिता शाश्वत विकास ध्येय्यांच्या अनुषंगाने एकूण 120 निर्देशकांचा समावेश करण्यात आला आहे. हे एकूण 120 निर्देशांक 17 विकास ध्येयांची पुर्तता करतात. या अहवालामध्ये मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, प्राथमिक शिक्षण परिषद, राष्ट्रीय कौटूंबिक आरोग्य सर्वेक्षण 4 व 5 तसेच जिल्हा व राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांकडून सांख्यिकी व इतर माहिती संकलीत करण्यात आलेली आहे. शाश्वत विकास ध्येये हे प्रकाशन हिंगोली जिल्ह्याची जिल्हा वार्षिक योजना तयार करण्यासाठी तसेच विविध विभागांना त्यांच्या विकास योजनांचे सनियंत्रण करण्यासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड, सहाय्यक संशोधन अधिकारी ए. ए. करेवार, सांख्यिकी सहाय्यक अ. दा. वाडोकार उपस्थित होते. *****

No comments: