20 August, 2016

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीच्या प्रलंबित अर्जाबाबत आढावा बैठकीचे आयोजन
हिंगोली, दि. 19 : - सन 2014-2015       2015-2016    चे भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क या योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्या संदर्भात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयामार्फत विशेष सुचना देण्यात येणार आहेत. तसेच शासन स्तरावरून भारत सरकार शिष्यवृत्ती संदर्भात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाची विशेष चौकशी पथकामार्फत तपासणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना विशेष चौकशी पथक प्रमुख तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांचेमार्फत देण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने दि. 22 ऑगस्ट, 2016 रोजी दुपारी 2.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथील सभागृहात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांचे अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्हयातील सर्व प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर बैठकीस सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्ती संदर्भात कामकाज करणारे लिपीक / कर्मचारी यांनी दुपारी ठिक 2.00 वाजता वेळेवरच उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर बैठकीस उपस्थित न राहिल्यास व शिष्यवृत्ती बाबत काही समस्या निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.            

*****

No comments: