15 August, 2016

पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते
‘सायबर लॅब’चे उद्घाटन

हिंगोली,दि.15 :- सायबर गुन्हेगारी रोखण्याबरोबरच गुन्ह्यांचा तात्काळ तपास करुन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालयांच्या क्षेत्रात सायबर लॅब सुरु करण्याचा गृह विभागाचा हा विशेष उपक्रम असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे म्हणाले.   
येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील सायबर लॅब च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई यशवंते, नगराध्यक्षा श्रीमती अनिता सुर्यतळ, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक अशोक मोराळे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन  गृह विभागाने राज्यात 51 सायबर लॅब पैकी 44 सायबर लॅबचे एकाच दिवशी  जिल्हा मुख्यालय आणि पोलीस आयुक्तालयांच्या क्षेत्रात सायबर लॅब’ 44  आजपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाचे हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करुन गुन्हे करत आहेत या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने राज्यात 51 महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रातसायबर लॅबउभारण्यात आले आहे.  या सायबर लॅबमुळे सायबर गुन्हेगारीवर वचक राहणार असून, सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास या सायबर लॅबचा उपयोग होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सायबर गुन्ह्यांचं स्वरुप व प्रकार बदलत चालले असून आपण याबाबत दक्ष राहायला हवे तसेच नागरिकांमध्ये आयटी ॲक्टच्याबाबतही जागरुकता करणे आवश्यक आहे, असे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविका दरम्यान जिल्हा पालीस अधिक्षक अशोक मोराळे म्हणाले की, या सायबर लॅबमुळे पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. सायबर लॅबमुळे तंत्रज्ञान, सोशल मिडीया यांच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसणार आहे. सायबर लॅबमुळे गुन्ह्याचा तात्काळ शोध लागण्यासही मदत होणार आहे,  असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले. तर अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी पोलीस विभागासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती होती.

*****







No comments: