23 August, 2016

गणेश उत्सव व दुर्गा उत्सवची वर्गणी वसूल करण्यासाठी परवानगी आवश्यक

हिंगोली, दि. 23 :-  जिल्ह्यात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा केली जाते. वर्गणी वसूल करण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी आवश्यक असून गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
वर्गणी वसुल करण्यासाठी गणेश मंडळांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असून गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे जसे की, विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. त्यावर रु. 10/- चा कोर्ट फीस स्टॅम्प, हिशोब पत्रके, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र, मंडळाच्या स्थापनेचा ठराव, जागेबाबत नगरपालिकेचे व ग्रामपंचायतीचे किंवा वैयक्तीक जागेवरच्या घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र व शपथपत्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज दि. 23 ऑगस्ट, 2016 पासून स्वीकारण्यात येतील व अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. 03 सप्टेंबर, 2016 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत  राहील, तसेच दुर्गोत्सवाची परवानगी दि. 20 सप्टेंबर, 2016 ते दि. 30 सप्टेंबर, 2016 दरम्यान कार्यालयीन वेळेत देण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त हिंगोली विभाग, यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                 ***** 

No comments: