09 August, 2016

जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबीर संपन्न

हिंगोली, दि. 8 :- राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे याच भुमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषीत करण्यात आले आहे. त्यानुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आय़ोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात खेळामध्ये बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळामधील कौशल्याची ओळख, नविन खेळाची ओळख, खेळाची शास्त्रोक्त माहिती क्रीडा शिक्षकांना करुन देण्यासाठी त्यांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांना अद्यावत प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबीराचे दि. 27 जुलै, 2016 ते 05 ऑगस्ट, 2016 या 10 दिवसाच्या कालावधीत सरस्वती विद्यालय, शारिरीक शिक्षण महाविद्यालय परिसर,  जवळा बाजार ता. औंढा (ना) येथे आयोजित कऱण्यात आले होते. या 10 दिवसीय प्रशिक्षण शिबीरामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, मैदानी, टेबल-टेनिस, कुस्ती, बुद्धीबळ, बॅडमिंटन, धनुर्विद्या, फुटबॉल इ. देशी-विदेशी खेळांचे प्रात्यक्षिकासह तज्ज्ञ मास्टर ट्रेनर मार्फत व विषय तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबीरामध्ये हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून 20 क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबीरात 100 क्रीडा शिक्षकांनी सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षण शिबीरामध्ये कबड्डीसाठी साहेबराव देवकते, डॉ. नवनाथ लोखंडे, मंगल पांडे, खो-खोसाठी डॉ. नागनाथ गजमल, जिमनॅस्टीकसाठी मकरंद जोशी, औंरंगाबाद व बॅडमिंटनसाठी ऋुतुपुर्ण कुलकर्णी, धनुर्विद्यासाठी रंगराव साळुके, ऍ़रोबिक्ससाठी श्री. गुंजकर, डोपींगबाबत प्रा. नंदकुमार मेघदे यांनी तसेच प्रशिक्षणाचे नियोजन व वेट ट्रेनिंग यासाठी विठ्ठलसिंग परीहार व खेळाडूंसाठी खेळ मानसशास्त्र या विषयावर प्रा. झुजारसिंग शिलेदार, खेळाडूंसाठी संतुलित आहार यासाठी चंद्रशेखर घुगे व शासनाच्या विविध उपक्रम व क्रीडा प्रबोधनी प्रवेशासाठी किशोर पाठक, संजय बेतीवार यांनी मार्गदर्शन केले. 10 दिवसीय मार्गदर्शन शिबीरामध्ये हिंगोली जिल्ह्यातून मास्टर ट्रेनर म्हणून रमेश गंगावणे, रामप्रकाश व्यवहारे, अशोक काकुळते, श्रीपाद पुराणिक, सुबोध मुळे, जयंत काळे, शिवाजी इंगोले, संजय ठाकरे, राज्य मार्गदर्शक (टेबल-टेनिस) सचिन पुरी, क्रीडा अधिकारी संतोष फुफाटे, सोपान नाईक, विजय जाधव, योग प्रशिक्षक म्हणून अनंत जाधव यांनी सकाळी व सायंकाळी नियमितपणे प्रात्यक्षिकासह विविध खेळाचे मार्गदर्शन केले.
दि. 05 ऑगस्ट रोजी दु. 2.00 वा. सदर प्रशिक्षण शिबीराचा समारोप झाला या समारोपीय कार्यक्रमासाठी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी हे उपस्थित होते. प्रमुख अतिथीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, संस्थेचे कोषाध्यक्ष रमेश नवले, शिव छत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य विजय शिनगारे, जवळा बाजारचे तलाठी मॅक मॅडम, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार आदी उपस्थित होते.
 यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. राम गगराणी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, क्रीडा शिक्षकांनी आपल्या खेळामध्ये रममान होऊन आपले आरोग्य निरोगी कसे राहता येईल व खेळाच्या माध्यमातून आपल्या आरोग्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य त्यांची सुदृढता व त्यांना खेळाचे मुलभुत कौशल्य कसे देता येतील व विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाबरोबरच खेळाची आवड निर्माण करुन एक चांगला खेळाडू निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी अग्रेसर रहावे असे आवाहन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी व त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टीने शासनाच्या विविध योजना व स्पर्धांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिव छत्रपती विजेते मंगल पांडे यांनी खेळ संघटनेच्या माध्यमाने खेळाडूंना न्याय देण्यासाठी क्रीडा विभागाने विशेष प्रयत्न करावे, अशी आशा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले तर सुत्र संचालन जयंत काळे यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी केले व सदर क्रीडा प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी सरस्वती विद्यालय व शारीरिक शिक्षण महाविद्याय व इंदिरा गांधी कन्या महाविद्यालय सर्व शिक्षक व बालाजी नरोटे, मनोहर डुरे, नविद पठाण, भागवत इंगोले, विजय जाधव, सिकंदर शेख, केशव मोरे आदिंना परिश्रम घेउन सदर क्रीडा प्रशिक्षण शिबीर यशस्वी केले.                     *****

No comments: