14 September, 2018

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.14: सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. सोमवार, दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 5.30 वाजता  शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव,  सकाळी 8.40 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण  करण्याचा कार्यक्रम, सकाळी 9.00 वाजता राष्ट्रध्वज वंदन समारंभ (स्थळ: मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभ, नगरपरिषद उद्यान, देवडा नगर लगत नांदेड रोड, हिंगोली), सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून वाहनाने जिंतूरमार्गे जालनाकडे प्रयाण करतील.
0000

No comments: