14 September, 2018

गणेश मंडळांना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रसिध्दी करण्याचे आवाहन


 गणेश मंडळांना ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’
अभियानाची प्रसिध्दी  करण्याचे आवाहन
           हिंगोली,दि.14: जिल्ह्यात सुरु झालेल्या गणेश उत्सवात गणेशमुर्ती स्थापनेच्या ठिकाणी विविध देखावे, चित्रीकरणाचे आयोजन करण्यात येते. या आयोजनात विविध बॅनर लावण्यात येतात. त्याअनुषंगाने सदर देखावे, चित्रीकरण व बॅनरमध्ये बेटी बचाओ, बेटी  पढाओ या अभियानाचे देखावे, चित्रीकरण व बॅनरचा समावेश करुन जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या चळवळीची प्रसिध्दी करावी. जेणेकरुन नागरिकांमध्ये जनजागृती होईल. त्याप्रमाणेच गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे, चित्रीकरण व बॅनर यांच्या फोटोसह अहवाल गणेश उत्सव संपल्यानंतर महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद हिंगोली या कार्यालयाकडे सादर करावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) यांनी सर्व गणेश मंडळास प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

No comments: