03 September, 2018

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या तारखांत बदल


जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या तारखांत बदल
हिंगोली,दि.3: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित होणा-या राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये बदल झाल्यामुळे विभागीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन वयोगट 17 वर्ष मुले / मुली दि. 11 सप्टेंबर 2018 रोजी व 19 वर्ष मुले/मुली  दि. 12 सप्टेंबर 2018 रोजी परभणी येथे होणार आहे.
त्यामुळे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सर्व गट दि. 7 व 8 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा परिषद प्रशाला, शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे घेण्यात येणार आहे. तरी आपआपल्या तालुक्यातील तालुका संयोजक यांच्याशी संपर्क साधुन आपल्या तालुक्यातील दिनांक व ठिकाणावर वेळेवर उपस्थित राहुन जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दि. 07 व 08 सप्टेंबर 2018 रोजी विजय संघांना सर्व तालुका क्रीडा संयोजक, क्रीडा शिक्षक, पालकांनी उपस्थित राहावे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
****

No comments: