03 September, 2018

किटकनाशके फवारतांना शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे आवाहन


किटकनाशके फवारतांना शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे आवाहन
हिंगोली,दि.3: गतवर्षी किटकनाशकामुळे विषबाधेच्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता खरीप हंगाम 2018 मध्ये या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कृषि विभागाने किटकनाशकांची काळजीपूर्वक हाताळणी करण्यासाठी जनजागृती अभियान राबविले आहे. कृषि विभागामार्फत या पूर्वीही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करुन ही किटकनाशके फवारणी करताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. या करिता सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा आवाहन करण्यात येते की, किटकनाशके फवारताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. फवारणी करताना शिफारसीप्रमाणे योग्य प्रमाणात किटकनाशकाचा वापर करावा, शिफारस नसताना दोन व दोनपेक्षा जास्त किटकनाशकांचे मिश्रण करुन फवारणी करु नये, फवरणीपूर्वी हातमोजे, गॉगल, ॲप्रान व बुट या संरक्षक किटचा वापर अत्यावश्यक आहे, शरीर व जखमा असल्यास  वा आजारी असल्यास त्या व्यक्तींनी फवारणी करण्याचे टाळावे, डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा रंगाचे चिन्ह असलेली किटकनाशके कमी विषारी असतात, तननाशके फवारणीचा पंप चुकुनही किटकनाशके फवारणीसाठी वापरू नये , असे उपविभागीय कृषि अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

No comments: