15 September, 2018

ई-विकास प्रणाली अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


ई-विकास प्रणाली अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि.15: जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानात, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, शिक्षण  शुल्क, परीक्षा शुल्काचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ई-विकास प्रणाली( www.etribal.maharashtra.gov.in) दिनांक 14 मार्च ते 30 एप्रिल 2018 पर्यंत सुरु  करण्यात आली होती. परंतू काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज हे एकाच वर्षात भरल्यामुळे किंवा काही विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडे उशिरा प्राप्त झाल्यामुळे ई- विकास प्रणाली दिनांक 7 ते 17 सप्टेंबर 2018 या कालावधीसाठी सुरु करण्यात येत आहे.
            ही अंतिम संधी देण्यात येत असून त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीतील पात्र विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरावेत. तसेच शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासाठी वरीलप्रमाणे ऑनलाईन लिंक सुरु  करण्यात येईल. ई-विकास प्रणालीवर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास  etribal.support@maharashtra.gov.in  या ई-मेलवर कळवावे, सदरची प्रक्रीया वेळेत पूर्ण करण्याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .
00000

No comments: