29 October, 2018

अनुसूचित जातीच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप


अनुसूचित जातीच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप

        हिंगोली, दि.29: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने सन 2018-19 मध्ये  अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 आश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रक्टर वाटप करण्यात येणार आहेत.
            त्याअनुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांनी खालील अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचतगट असावा, बचतगटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे, गटामध्ये किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असावेत, पैकी 80 टक्के सदस्य  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत, गटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत, सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे आवश्यक, गटातील सर्व सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे व ते आधार क्रमांकासी संलग्न असावे, संबंधित गटाने / गटातील सदस्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, निवडीनंतर गटाला 10 टक्के रकमेचा डिमांड ड्राफ्ट द्यावा लागेल, अर्ज उद्दिष्टापेक्षा जास्त पात्र ठरल्यास गटाची निवड ही लक्की ड्रॉ पध्दतीने करण्यात येईल.
            वरील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी तसेच यापूर्वी अर्ज सादर  केले परंतू लाभ न मिळालेल्या बचत गटांनी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सहायक आयुक्त , समाज कल्याण, हिंगोली  या कार्यालयात दिनांक 13 नोव्हेंबर 2018 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण , हिंगोली यांनी केले आहे.
****

No comments: