16 October, 2018

जळगांव येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


जळगांव येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि.16: सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जळगाव येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारासाठी दिनांक 20 ते 30 नोव्हेंबर 2018 रोजी सोल्जर (जनरल ड्युटी), सोल्जर टेक्निकल(अेव्हीऐशन), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट), सोल्जर क्लर्क या पदासाठी जळगांव येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरीता उमेदवरांनी सर्वप्रथम www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 4 नोव्हेंबर, 2018 पर्यंत नोंद करावी. तसेच दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर, 2018 पर्यंत भरती करीता ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे. या भरती मेळाव्यासंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली यांचेशी संपर्क साधावा तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त उमेदवारांनी भरतीस हजर राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
****

No comments: