31 October, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन











जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

        हिंगोली,दि.31: सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार,  उपजिल्हाधिकारी (रोहयो)  तथा निवासी उपजिल्हाधिकारी  खुदाबक्ष तडवी,  उपजिल्हाधिकारी (निवडणुक) गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागच्या सहायक संचालीका रेणुका तम्मलवार यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

****

No comments: