17 October, 2018

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा सुधारीत जिल्हा दौरा


पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा सुधारीत जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.17: सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
            पालकमंत्री कांबळे हे शुक्रवार, दिनांक 19 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 08.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव, सकाळी 10.00 वाजता हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी, राहोली खु., केसापूर, काळकोंडी व नवलगव्हाण या  टंचाई सदृश्य गावांना भेटी व तालुकास्तरीय बैठक (जिल्हाधिकारी , संबंधित तालुक्यातील प्रांत, तहसिलदार, गट विकास अधिकारी , कृषि अधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी समवेत) , दुपारी 01.00 वाजता प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात  मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग मध्ये सहभाग, दुपारी  02.00 वाजता हिंगोली जिल्ह्यातील टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा  बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), दुपारी 04.00 वाजता कळमनुरी तालुक्यातील जांभरुन, रेणापूर, सालेगाव, मोरवाड व वाकोडी या  टंचाई सदृश्य गावांना भेटी व तालुकास्तरीय बैठक (जिल्हाधिकारी, संबंधित तालुक्यातील प्रांत, तहसिलदार, गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी समवेत), सोयीनुसार शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन मुक्काम.
            शनिवार, दिनांक 20 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता सेनगाव तालुक्यातील जवळा बु. धनगरवाडी, खेरखेडा, म्हाळसापूर व ताळतोडा या टंचाई सदृश्य गावांना भेटी व तालुकास्तरीय बैठक (जिल्हाधिकारी, संबंधित तालुक्यातील प्रांत, तहसिलदार, गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी समवेत), दुपारी 2.00 वाजता हिंगोली जिल्हा खनिज प्रतिष्ठाण अंतर्गत नियामक परिषदेची बैठक, दुपारी 03 ते 4 वाजता  हिंगोली येथे राखीव, दुपारी 04.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून वाहनाने जिंतूर-जालनामार्गे औरंगाबादकडे प्रयाण.
****

No comments: