20 February, 2022

 



जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 20 :  येथील जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल व सर्व पत्रकार बांधवानी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा पत्रकार भूषण पुरस्कार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांना नुकताच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल त्यांचा जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी पत्रकार शांताबाई मोरे, कल्याण देशमुख, प्रकाश इंगोले, प्रा. यु. एस. बलखंडे, बाबाराव ढोकणे, विलास जोशी, हाफिज बागवान, एफ. टी. नागरे, चंद्रकांत वैद्य, विजय गुंडेकर तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी आशाताई बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे हे उपस्थित होते.  

*****

No comments: