16 February, 2022

 


नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवकांसाठी एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 

हिंगोली, (जिमाका) दि. 16 : येथील नेहरु युवा केंद्राच्या वतीने इन्स्पायर अकॅडमी या ठिकाणी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाल बोस हे होते. शिबिराचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शुभम गोकर्णे, प्रमुख वक्ते श्री.कदम उपस्थित होते.

या शिबिरांमध्ये युवकांना त्यांच्या भविष्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आपले पुढचे भवितव्य घडवण्यासाठी कोणते मार्ग आहेत, कोणत्या संधी आहेत, ते आपले करिअर कशांमध्ये बनवू शकतात याविषयी तसेच युवकांचे आरोग्य सकारात्मक जीवन शैली, पोषण, प्रतिकार शक्ती, कोविड-19 ची खबरदारी कशी घ्यावी याबाबत डॉ. शुभम गोकर्णे यांनी मार्गदर्शन केले.

श्री. गोपाल बोस यांनी मुलांना कोणत्या संधी आहेत, आपले ध्येय कसे निश्चित केले पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे याविषयी भागवत गीतेतील उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. तसेच श्री. कदम यांनी युवकांनी कोणते व्यवसाय निवडावेत असे सांगून व्यवसाय उभारण्यासाठी शासनाच्या कर्ज योजनांची माहिती दिली.

यावेळी अकॅडमीचे कर्मचारी, परिसरातील युवक उपस्थित होते. हा कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयेाजन हिंगोली तालुका समन्वयक प्रवीण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकांडे, सोपान सोनटक्के यांनी केले.  

यावेळी रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, नायब तहसिलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

***** 

No comments: