15 February, 2022

 

अनुसूचित जमातीच्या शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी

वैयक्तीक, सामुहिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 15 : अनुसूचित जमातीच्या शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींना सन 2021-22 मधील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत मंजूर आराखड्यानुसार वैयक्तीक, सामूहिक लाभ देण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर काटेरी तार पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर तुषार संच पुरवठा करणे, आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर पापड तयार करण्याचे मशिन पुरवठा करणे, आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर शेतीतील हळद उकडण्याचे कुकर पुरवठा करणे, आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना 85 टक्के अनुदानावर  डी.टी.पी काम करण्यासाठी संगणक संच व प्रिंटर पुरवठा करणे, आदिवासी  लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर मिनी दालमिल घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर छोटा व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी  युवती-महिलांना 85 टक्के अनुदानावर ब्युटी  पार्लरच्या व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर रासायनिक खते, बि-बियाणे, औषधी घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी युवक-युवतींना संगणकावर एम एस सीआयटी  प्रशिक्षण देणे ( अनिवासी), आदिवासी युवक-युवतींना संगणकावर मराठी 30 व इंग्रजी 40 शं.प्र.मी. टंकलेखनाचे एकत्रित प्रशिक्षण देणे ( अनिवासी), आदिवासी युवक-युवतींना वैद्यकीय, अभियांत्रीकी पूर्व परीक्षा प्रशिक्षण देणे ( नोटसह निवासी), आदिवासी युवक-युवतींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणे ( नोटसह निवासी), आदिवासी युवक-युवतींना हलके चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे ( अनिवासी),आदिवसी युवकांना इलेक्ट्रिकल वायंडरचे प्रशिक्षण देणे ( निवासी), बँकींग ॲण्ड फायनान्स सर्व्हीसेसचे  एम के सी एल मुक्त विद्यापीठामार्फत प्रशिक्षण देणे, सुशिशित बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देणे, आदिवासी युवकांना डीटीपी प्रशिक्षण देणे, आदिवासी युवक-युवतींना टॅली अद्ययावत व्हर्जनचे प्रशिक्षण देणे (अनिवासी), आदिवासी  युवक-युवतींना (हॉस्पिटलमध्ये) General Duty Assistant Advanced सामान्य कर्तव्य सहाय्यकाचे प्रशिक्षण देणे (नर्सिंग निवासी), आदिवासी  युवक-युवतींना सेंट्रल स्टराईल सर्व्हिस डिपार्टमेंट  (CSSD)( ICU) प्रशिक्षण देणे ( निवासी),आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना जैविक खते तयार करण्याचे पावडर वाटप करणे व मार्गदर्शन कार्यशाळा घेणे,आदिवासी लाभार्थ्यांना आपत्कालीन मदत करणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षित झालेल्या आदिवासी  प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे, आदिवासी लाभार्थ्यांच्या घरी 2.5 विद्युत जोडणी करणे आणि वीज मीटर देणे, अति सूक्ष्म व सूक्ष्म उद्योगांसाठी उद्योग प्रशिक्षण देणे.

वरील सर्व योजनांचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळमनूरी  जि. हिंगोली  यांच्या नावे आवश्यक त्या कागदपत्रासह दि.21 फेब्रुवारी 2022 पासून  दि.17 मार्च 2022 पर्यंतच्या कालावधीत  कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उपरोक्त योजनांमध्ये अंशत: , पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा  अधिकार प्रकल्प अधिकारी  एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प कळमनूरी  जि. हिंगोली यांनी राखून ठेवला आहे.

प्रकल्पार्तंगत असलेल्या लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन छंदक लोखंडे,  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***** 

No comments: