15 February, 2022

 नामांकित निवासी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 15 : नामांकित निवासी इंग्रजी माध्यम शाळा प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पालकांना प्रवेश अर्ज देण्यात येणार आहे. यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली व दुसरी वर्गासाठी  प्रवेश घेण्यासाठी नामांकित निवासी माध्यम शाळेचे प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी कार्यालय, कळमनुरी येथे  10 मार्च, 2022 पर्यंत वाटप करण्यात येणार आहेत, याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन  छंदक लोखंडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.

या प्रवेशासाठी तहसीलदार याचे पालकांचे एक लाखापेक्षा कमी असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पालक शासकीय नोकरीत नसल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, पालकांचे उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र, अंगणवाडी किंवा ग्रामसवेक यांचा जन्माचा दाखला, इयत्ता पहिलीसाठी जन्म दि. 1 ऑक्टोबर, 2014 ते 31 डिसेंबर, 2016 या कालावधीतील असावा. पालकाचे ग्रामसेवकांचे रहिवाशी प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र (फिटनेस लेटर), विद्यार्थ्याचे आधार कार्ड, दुसरी वर्गासाठी इयत्ता पहिलीचे बोनाफाईड, तीन पासपोर्ट कलर फोटो, विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. या अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

वरील सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरेल. सदरची माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी असल्यास संबंधित पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सर्व नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना परस्पर प्रकल्प कार्यालयाच्या आदेशाविना प्रवेश देऊ नये. तसे आढळून आल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेशाची पूर्ण जबाबदारी आपल्या शाळेची राहील, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: