09 February, 2022

 

मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 09 : प्रमोद महाजन कौशल्य  विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2021-22 या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थी हँड एम्ब्रॉयडर, एडिटर, रिटेल सेल्स असोसिएट, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ड्रायिंग, डिहायड्रेशन टेक्नीशियन, जॅम, जेली अँड केचप प्रोसेसिंग टेक्नीशियन, पिकल मेकींग टेक्नीशियन, इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोल्युशन्स, लाईनमेन डिस्ट्रीब्यूशन, फिटर-मेकॅनिकल ॲसेम्ब्ली, आयटी  को-ऑर्डीनेटर इन स्कूल, सोलार पॅनेल इंस्टॉलेशन टेक्निशियन, असिस्टंट सर्वेअर, डोमेस्टीक डाटा एन्ट्री ऑपरेटर, सीआरएम डोमेस्टीक नॉन व्हाईस, इन्व्हेंटरी क्लर्क, कुरीअर डिलेव्हरी एक्झ‍िक्युटीव्ह या एकूण 16 कोसेर्समध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात.

            इच्छूक लाभार्थ्यांनी दि. 16 फेब्रुवारी, 2022 पूर्वी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगारक्षम बनावे, असे आवाहन डॉ. रा.म.कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: