11 August, 2022

 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा

12 ऑगस्ट रोजीचा हिंगोली जिल्हा दौरा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दि. 12 ऑगस्ट, 2022 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दि. 12 ऑगस्ट, 2022 रोजी मेंढला ता. अर्धापूर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाची पाहणी करुन दुपारी 1.00 वाजता माळवटा ता. वसमत येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून पाहणी करणार आहेत. दुपारी 1.30 वाजता कुरुंदा ता.वसमत येथे शेतकऱ्यांशी संवाद व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, दुपारी 2.00 वाजता नागेशवाडी ता. औंढा नागनाथ येथे शेतकऱ्यांशी संवाद व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, 2.30 वाजता राजाळा ता. औंढा नागनाथ येथे शेतकऱ्यांशी संवाद व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी . दुपारी 3.00 वाजता मोटारीने जालनाकडे प्रयाण .  

****

No comments: