14 August, 2022

 

स्वराज्य सप्ताह निमित्त’ 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता

 समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम

 

हिंगोली (जिमाका) दि. 14 :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमाचे 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन या उपक्रमासाठी शासनाकडून पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.

17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल. या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग असेल. सकाळी 11.00 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल. सकाळी 11.00 ते 11:01 या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. सर्व संबंधित यंत्रणांनी राज्यातील सर्व नागरिकांना दिनांक 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आहे. त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे. खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक राहील. शाळा,  महाविद्यालय,  शैक्षणिक संस्था, विद्यापीठे येथे या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती द्यावी. सरकारी, खाजगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य राहील. राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी होणे आवश्यक राहील.

 

*****

No comments: