08 August, 2022

 

पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 : येलदरी प्रकल्प 76.48 टक्के व सिध्देश्वर प्रकल्प 88.42 टक्के भरला असून कोणत्याही क्षणी धरणातून वक्रद्वाराने पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे नदी काठच्या गावाना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील, पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

तसेच कोणीही नदी पात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी संबंधित गावांमध्ये दवंडी तसेच महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा इत्यादी माध्यमाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, अशा सूचना सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमतच्या तहसीलदारांना दिलेल्या आहेत.

*******

No comments: