01 August, 2022

 जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 

 


हिंगोली, (जिमाका) दि. 01 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.  याप्रसंगी  निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी मिलींद वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

******

No comments: