14 August, 2022

 जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित तिरंगा सायकल राईडमध्ये सहभागी रायडरचा 

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गौरव




हिंगोली, (जिमाका) दि. 14 : जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत काढण्यात आलेल्या 75 कि.मी. तिरंगा सायकल राईडचा समारोप कार्यक्रम येथील महावीर भवनमध्ये  आयोजित करण्यात आला होता.  यावेळी तिरंगा सायकल राईड मध्ये सहभागी झालेल्या सर्व रायडरचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची प्रमुख उपस्थित होती . 

  

  *****

No comments: