09 August, 2022

 



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले औंढा नागनाथाचे दर्शन

हिंगोली (जिमाका),दि.८: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज हिंगोली दौऱ्यावर आले असता, देशातील १२ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले ८ वे ज्योर्तिलिंग औंढा नागनाथ  येथील देवस्थान श्री. औंढा नागनाथाचे त्यांनी आज दर्शन घेतले.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, संजय राठोड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार डॉ.  कृष्णा कानगुले, सां.बा. उप अभियंता श्री. धोंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे आदींची उपस्थिती होती.

 

***

No comments: