22 December, 2023

 

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या नोंदणीसाठी 7 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे

                         

  हिंगोली (जिमाका), दि. 22 : दर दोन वर्षानी आयोजित केली जाणारी जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रान्स (ल्योन) येथे होणार आहे. या स्पर्धेच्या नोंदणीसाठी दि. 7 जानेवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पीक खेळासारखीच आहे. त्यानुषंगाने या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतर असणे अनिवार्य आहे. तसेच ॲडक्टीव्ह मन्युफक्चरींग, क्लाऊड कॉम्युंटींग, सायबर सेक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलाजी, इंडस्ट्री 4.0 , इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलींग, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन ॲन्ड वाटर टेक्नॉलाजी या क्षेत्रासाठी उमेदवारांचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन आपली नोंदणी करावी. या स्पर्धेच्या नोंदणीसाठी दि. 7 जानेवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 मध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतन आणि इतर प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी तसेच कौशल्य धारण केलेल्या युवक-युवतींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी केले आहे.

******* 

No comments: